दहावीचा निकाल ९८.५८%
श्रमिक विद्यालय चिल्हेच्या विद्यार्थ्यांची बाजी कु. कृतिका कचरे ९०.६०% गुण प्राप्त करत संस्थेत प्रथम
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या निकालामध्ये रोहा तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य व नावलौकिक असलेल्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या संस्थेची आपली यशस्वी इयत्ता दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली. या संस्थेचा दहावीचा निकाल ९८.५८ % लागला आहे, तर श्रमिक विद्यालय चिल्हेच्या विद्यार्थ्यांची बाजी कु.कृतिका देवजी कचरे ही विद्यार्थीनी ९०.६० % गुण संपादित करत संस्थेत प्रथम आली.
न शि प्र मं खांब संस्थेच्या शाळांची यशस्वी परंपरा मुलींची बाजी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचालित रा ग पोटफोडे (मास्तर ) विद्यालय खांब या शाळेचा यंदाचा इयत्ता १० वी चा एकूण निकाल हा 97.५% लागला असून कु ऋतिका संतोष देवकर ही ८८.६० % गुण मिळवून वर्गात पहिली आली तर कु जानवी नितीन कापसे ही ८८.२० % गुण मिळवून दुसरी तसेच कु सानिका राजू शिंदे हिने ८६ % गुण संपादित करत तिसरी आली आहे.तसेच श्रमिक विद्यालय चिल्हे शाळेचा एकूण निकाल ९७.९१% लागला असून या या शाळेतील विद्यार्थ्यांनी संस्थेत बाजी मारली असून कु.कृतिका देवजी कचरे हिने ९०.६०% गुण मिळवून वर्गात व संस्थेत , प्रथम आली तर कु. सानिका सुरेश रसाळ ९०% गुण संपादित करत वर्गात व संस्थेत दुसरी आली तसेच कु .साक्षी सुनील पुगावकर हिने ८९.२०% प्राप्त करत वर्गात तसेच संस्थेत तिसरी आली असून येथील विद्यार्थ्यांनी संस्थेत आपली परंपरा कायम राखली आहे .तसेच द न्यू इंग्लिश स्कूल द न्यूविठ्ठलवाडी या शाळेलतील विद्यार्थी वर्गाने १००% निकाल देत कु.ऋतिक लक्षण धनावडे याने ८६.२०% गुण मिळवून वर्गात प्रथम आला.कु. राज रामदास ओमले याने ८४.४०% गुण मिळवून वर्गात दुसरा तर कु. हरेश भालचंद्र चव्हाण याने ८०.४०% गुण प्राप्त करत तिसऱ्या क्रमांकाची बाजी मारली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षक वर्गाचे विविध स्तरांवर कौतुक व अभिनंदन
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे न शि प्र मं खांबचे संस्थापक अध्यक्ष व रायगड भूषण रा ग पोटफोडे मास्तर, चेअरमन महेंद्रशेठ पोटफोडे, उपाध्यक्ष राम शेठ कापसे,सचिव धोंडू कचरे,संचालक शंकरराव म्हसकर,भाई पोटफोडे, रामचंद्र चितळकर,धनाजी लोखंडे,प्रकाश थिटे,मारुती खांडेकर, वसंत मरवडे,राम मरवडे,विजय पवार,धनवी सर,सागर मोरे, मोरे,धामणसे,जाधव,भोईर, सह संचालक मंडळ तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून मनोज शिर्के,वसंत भोईर,संदेश कापसे,रमण कापसे,संदीप जाधव,सुनील महाडिक,अविनाश म्हात्रे,सूरज कचरे,बाळकृष्ण बामणे,अनंत थिटे, गजानन बामणे,तसेच सौ नेहा म्हसकर,सौ सुप्रिया जाधव,सौ सौ मानसी लोखंडे, कांचन मोहिते,सौ मालती खांडेकर,सुजाता सुटे,गुलाब वाघमारे,इत्यादीनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच रा ग पोटफोडे (मास्तर) व कै द ग तटकरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश जंगम,श्रमिक विद्यालय चिल्हे चे मुख्याध्यापक दीपक जगताप,विठ्ठलवाडी शाळेचे मुख्याध्यापक अनिल खांडेकर,पर्यवेक्षक नरेंद्र माळी, धामणसे,म्हात्रे,जवरत,दराडे,शिद, मरवडे,मोरे,थिटे,डाके,चितळकर, सोनवणे,आंधळे,सुरवसे,चटाले,पोटफोडे, वरखले,कांबळे,वारगुडे, तुपकर, क्षीरसागर, लोखंडे, कळमकर,घरटं आदी शिक्षक वर्ग कर्मचारी वृंद यांनी यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या.
संस्थेत विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखली :- महेंद्र पोटफोडे
न शि प्र मं खांब संचालित खांब, चिल्हे, विठ्ठलवाडी ,या सर्व शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी खांब कोलाड विभागासह रोहा तालुका व रायगड जिल्ह्यात दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल व उज्वल यश संपादन केल्याबद्दल मी शाळेतील तसेच दहावीतील सर्व विद्यार्थी, गुरूजन, पालक यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस संस्थेचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.






Be First to Comment