Press "Enter" to skip to content

माथेरान मध्ये शिवसेना शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

माथेरान मध्ये शिवसेनेची स्थापना ९ जून १९८७ साली करण्यात आली होती तेव्हापासून ते आजमितीपर्यंत इथे पक्षाची शाखा अस्तित्वात नव्हती.याकामी शिवसेनेचे कार्यसम्राट ,गावातील एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित असलेले शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी शहराच्या मध्यवर्ती भागात शिवसेना शाखेचे कार्यालय बनविले असून या शाखेचा उद्घाटन सोहळा कर्जत- खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी शहरप्रमुख दिवंगत कुमारभाई चौधरी यांच्या पत्नी आनंदीबाई चौधरी,शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, उप शहर प्रमुख प्रमोद नायक, सागर पाटील,वन समिती अध्यक्ष योगेश जाधव, वन समिती सदस्य ज्ञानेश्वर बागडे, चिटणीस वसंत कदम,माजी नगरसेवक प्रकाश सुतार, अवधूत येरफुले, कुलदीप जाधव,प्रसिद्धी प्रमुख अमोल चौगुले, जेष्ठ शिवसैनिक मनोहर रांजाणे,गणेश कदम,शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच युवा सेना, युवाअधिकारी निमेश मेहता ,महिला आघाडीच्या समस्त पदाधिकारी सदस्या, कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.

शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी मित्र परिवारा तर्फे दिव्यांग बांधव, जेष्ठ गरजू नागरिक तसेच निराधार महिलांना दरमहा एक हजार रुपये मासिक पेन्शन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्याचा शुभारंभ सायंकाळी पाच वाजता श्रीराम चौकात आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, सहायक पोलीस निरीक्षक संजय बांगर, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सरचिटणीस अजय सावंत, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पतोडीया यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे, पतसंस्था सभापती हेमंत पवार, उप सभापती नारायण कदम, रिक्षा संघटना सचिव सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष राजेश दळवी, भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ, शेकापचे चिटणीस शफिक शेख, मनसे अध्यक्ष संतोष कदम, आरपीआय अध्यक्ष अनिल गायकवाड, व्यापारी संघटना अध्यक्ष राजेश चौधरी, कोकण वासीय समाज अध्यक्ष शैलेंद्र दळवी, मुस्लिम समाज अध्यक्ष नासीर शारवाण, चर्मकार समाज अध्यक्ष गजानन अबनावे, मराठा समाज अध्यक्ष विकास पार्टे, वाल्मिकी समाज अध्यक्ष अंबालाल वाघेला, धोबी समाज अध्यक्ष आकाश चौधरी, धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व कार्यक्रमाचे निमंत्रक आयोजक रेखा चौधरी, चंद्रकांत चौधरी होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.