कर्जत मध्ये 4 लाख 83 हजार 300 ची घरफोडी
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी 13:30 वा.सुमारास मौजे नानामास्तर नगर,विजय हॉरीजन,रुम नं.1 पहीला माळा फिर्यादी रा.कर्जत यांचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कडी कोयंडा,कशाने तरी तोडुन त्यावाटे आत प्रवेश करुन बेडरुम मधील लोखंडी कपाट उघडुन त्यामध्ये ठेवलेले स्टीलच्या डब्यातील सोन्या चांदीचे दागिने स्टीलचा डबा व त्यामध्ये ठेवलेल्या एकूण 4 लाख 83 हजार 300/-रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने पावत्यासह स्वत:च्या फायदयाकरीता लबाडीच्या हेतुने घरुफोडी करुन चोरुन नेले.
याबबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 322/2021 भा.दं.वि.क. 380, 454 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे हे करीत आहेत.








Be First to Comment