माथेरानमध्ये पोलीसांना पोलीस व्हॅनला परवानगी देण्याची गरज
सिटी बेल | माथेरान | संजय गायकवाड |
माथेरान हे जगभरातील पर्यंटकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. येथे बारमाही पर्यंटनांची वर्दळ असते,हे एकमेव पर्यंटन स्थळ असे आहे की जिथे वाहनांना बंदी आहे. येथे ब्रिटिशाचे कायद्याचे पालन आजही केले जाते आहे.2003 साली माथेरान पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्र जाहिर केले आहे.या मध्ये केवळ अग्निशमन दलाची गाडी व रुग्णवाहिका यांना परवानगी देण्यात आली. येथे वाहन म्हणून घोङा तसेच हात रिक्षाला परवानगी आहे.माथेरान मध्ये गुन्हेगार चे प्रमाण कमी असेल तरी कधीतरी गंभीर गुन्ह्याची नोंद होते. त्यावेळी घटनास्थळी पोलीसांना पोहोचण्यासाठी घोङयाचा वापर करावा लागतो.
माथेरान मध्ये तत्कालीन रायगड पोलीस अधिक्षक टी. एस.भाल तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गांगुर्डे असताना तत्कालिन माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी 1992 साली पाठपुरावा करून माथेरान करता पोलीस दलात घोङयाची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन माथेरान पोलीस ताफ्यात दोन उमदे घोडे नाशिक जिल्ह्यातील यवला मधून आणले होते. एकाचे नाव ब्राऊनी तर दुसरा ब्लॅकी ही जोडी माथेरान पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यातील ब्लॅकी हा घोङा 2006 साली मरण पावला. त्याची समाधी माथेरान पोलीस ठाण्याच्या आवारात बांधण्यात आली,त्यावर तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद वायसे पाटील यांनी व इतर पोलीसांनी श्रद्धांजली वाहिलेले मजकूर ब्लॅकी च्या सेवेची आजही साक्ष देत आहेत.तर ब्राऊनी ने वयोवृद्ध होईपर्यंत पोलीसांची सेवा केली. ही जोडी पोलीस ठाण्यात येणा-या वरिष्ठ अधिकारांचे लक्ष वेधून घेत होती.
आजही माथेरान पोलीस ठाण्या मध्ये दोन घोडे आहेत, परंतु येथे येणा-या प्रत्येक अधिकारी यांना घोङयाची टेंनिग नसल्याने घोडा चालवणे जमत नाही, तसेच माथेरान हे सुमारे पंचावन्न किलो मीटर परिसरात व्यापले आहे तसेच संपुर्ण माथेरान हे जंगल तसेच द-या खो-यात असल्याने एखादी घटना घडली तर पोलीसांना घटना स्थळी पोहचण्यासाठी वेळ लागतो तर आरोपीला न्यायलात हजार करण्यासाठी पोलीस ठाणे ते दसतुरीवर नाका हे चार किलोमीटर चे अंतर आरोपी सह पोलीसांना चालत जावे लागते.
एकादा गंभीर गुन्हातील आरोपी चालत घेऊन जाताना आपण केल्याच्या गुन्हा मध्ये आपल्याला शिक्षा होईल किंवा पश्चात्तापाने पोलिसांच्या हातातुन पळून जाऊन आजू बाजूला दरी असल्याने दरी उङी मारू शकतो अश्या वेळी पोलीसांना आरोपीला न्यायलात ने आण करताना तारेवरची कसरत करावी लागते. या करता अत्यावश्यक असेल तेव्हा निदान आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी किंवा घटनास्थळी पोहचण्यासाठी पोलीस व्हॅनकरिता परवानगी दिल्यास काही प्रमाण पोलीसांची समस्या दुर होऊन गुन्हाचा तपास करण्यासाठी पोलीसांसाठी जमेची बाजू ठरू शकते, तसेच एखाद्या गंभीर गुन्हाची उकल लवकर करता येऊ शकते.








Be First to Comment