खारघर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटलची शाखा सुरू : डॉ.जयश्री आणि डॉ.प्रकाश पाटील यांची पुढची पिढी आरोग्य सेवेत रुजू
सिटी बेल | खारघर |
पनवेल मधील नामांकित अश्या लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ प्रकाश यांनी गेली १५ ते २० वर्षे पनवेल परिसरातील नागरिकांची सेवा केल्यानंतर आता खारघर व मधील नागरिकांसाठी त्यांच्या माध्यमातून नवीन शाखा खारघर मध्ये उघडली याचा आनंद होत आहे असे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. ते खारघर मध्ये लाईफ लाईन हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यासाठी पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर,पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,नगरसेविका लीना गरड, नगरसेविका नेत्रा किरण पाटील ,खारघर भाजप मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
“मी या भागात आयव्हीएफ थेरेपी सुरू केल्यानंतर ज्या जोडप्यांना मूल होत नव्हते त्यांच्या डोळ्यात आनंद निर्माण केला,आता माझा मुलगा अजिंक्य पाटील यांनी युरोलॉजी मध्ये प्राविण्य मिळवले आहे,तसेच माझी मुलगी केतकी पाटील म्हस्के ही महिलांचे आजार आणि जावई अभिजित म्हस्के हे हाडांचे विकार या मध्ये निषणांत आहेत,तेव्हा पनवेल सह खारघर मधील नागरिकांसाठी सेवा देताना आनंद होईल.” डॉ. प्रकाश पाटील, डायरेक्टर लाईफ लाईन हॉस्पिटल













Be First to Comment