Press "Enter" to skip to content

माथेरानमध्ये राष्ट्रवादीचे जनसंपर्क अभियान

सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |

माथेरानमध्ये मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्रिय झाली असून पक्षातील पदाधिकाऱ्यांचे खांदे पालट होताच पक्षाला एक नवी उभारी आली असून रायगड जिल्हा सरचिटणीस अजय सावंत यांच्या नेत्तुत्वाखाली नवीन शहराध्यक्ष श्री राजेश दळवी यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनी येथील शहरामध्ये जनसंपर्क अभियान सुरू केले असून घरोघरी जाऊन पक्षाची ध्येय धोरणे सांगून पक्ष बलकटिकडे पाऊल उचलले आहे.

माथेरान नगरपालिकेवर सर्वाधिक सत्ता भोगण्याचा बहुमान राष्ट्रवादीला आहे मागील निवडणुकीमध्ये मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता पण अनेक उमेदवार हे थोड्याश्या फरकाने पराभूत झाले होत त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षावर नाराज होऊन मतदानातून आपला रोष व्यक्त केला होता पण आज हेच कार्यकर्ते सर्व विसरून पुन्हा एकदा पक्ष बांधनिस पुढाकार घेताना दिसून येत असून जनसंपर्क अभियानास मोठा प्रतिसाद लाभत आहे. अनेक तरुण पक्षाकडे आकर्षित होत असून विनाशर्त पक्षाचे काम करण्यास स्वतःहून पुढे येत आहेत ह्या वेळी घरोघरी गेल्याने अनेक महिलांनीही आपल्या व्यथा बोलताना मागील चुका सुधारून ह्यावेळी पक्षाबरोबर उभे राहणार असे स्पष्ट शब्दात सांगितले.

राज्यात व माथेरान मध्ये राष्ट्रवादी सरकार असताना अनेक विकासकामे झालेली आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने शून्य अनुदानातून नवीन पाणीपुरवठा योजना,येथे सध्या सुरू असलेल्या एमएमआरडीए साठी रस्त्यांना दिला गेलेला 127 कोटी निधी माथेरान करांचे धुळवीरहीत रस्त्यांचे स्वप्न अवकाश केंद्र, कचऱ्यापासून वीज निर्मिती असे अनेक विकास कामे झालेली आहेत व त्याचे विस्मरण नागरिकांना नसल्याचे ह्यावेळी प्रकर्षाने जाणवले.

ह्या अभियानात रायगड जिल्हा सरचिटणीस श्री अजय सावंत , शहराध्यक्ष राजेश दळवी,नगरसेविका वर्षा रोड्रिंक्स महिलाअध्यक्षा स्वाती कुमार, गिरीश पवार,सीताराम कुंभार,स्नेहा चव्हाण आतिष ढेबे अष्पाक बढाने आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.