Press "Enter" to skip to content

सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथील घटना

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तोंडात रुमाल कोंबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरोपीला 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तोंडात रुमाल कोंबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे अल्पवयीन मुलीवर रविवारी (ता.12) रात्री 11 ते 11:30 च्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात सोमवारी (ता.13) सकाळी 11:20 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून सायंकाळी 4:11 वाजता आरोपीला पाली पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीला शुक्रवार (ता.17) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की पीडित अल्पवयीन मुलगी ही माथेरान येथे राहत असून. सध्या ती सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहायला आली होती. नेरळ जिल्हा रायगड येथे राहणाऱ्या मारुफ शेख (वय 19) या युवकाने गोकुळवाडा येथे मुलीच्या घरी जाऊन तिच्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्या अंगावर झडप टाकून तोंडात रुमाल कोंबून बलात्कार केला व घडला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. असे तक्रारीत म्हंटले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.