Press "Enter" to skip to content

कर्जत मधील विद्यालयामध्ये श्लोकांचे पठण कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

मार्गशीर्ष शु .एकादशी, गीता जयंती निमित्त कर्जत मधील इंग्लिश मिडीयम व अभिनव ज्ञान मंदिर शाळेत गीता पूजन व 12 अध्याय व इतर एकूण 40 निवडक श्लोकांचे पठणचा कार्यक्रम संपन्न झाला.

इंग्लिश मिडीयम विद्यालयात मुख्याध्यापिका आश्विनी साळोखे, बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे, प्रखंड मंत्री विशाल जोशी यांनी दीपप्रज्वलन व श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन केले या नंतर कु. सई जोशी यांनी गीतेतील 12 भक्तियोग अध्याय पठण केला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान म्हणून झाली.

अभिनव ज्ञान मंदिर येथे प्रशालेच्या सकाळ विभाग परिवेक्षीका रश्मी मोरे, बळीराम डोंगरे,मिताली मुसळे, सौरभ हिवरेकर, दया हजारे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. दुपार विभाग परिवेक्षक दुराजी शिंदे, उपमुख्याध्यापक विलास पिंगळे,बजरंग दल कुलाबा जिल्हा संयोजक साईनाथ श्रीखंडे, प्रखंड मंत्री विशाल जोशी यांनी दीपप्रज्वलन व श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन केले. नंतर मिताली मुसळे यांनी गीतेतील 40 निवडक श्लोक म्हटले व कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदान म्हणून झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.