Press "Enter" to skip to content

उरणमध्ये पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना अटक

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

उरणच्या पिरवाडी समुद्रकिनारी पिस्तुल बाळगणार्‍या दोघांना गाडीसह उरण पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उरणच्या पिरवाडी समुद्र किनारी असलेल्या हेलिपॅड जवळ शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या जीपमध्ये दोघेजण पिस्तुल घेऊन आल्याची खबर लागली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाड टाकताच त्यांना जीप गाडीजवळ निल राजभर(35) आणि राज थळी(32) हे पिस्तुल घेऊन असल्याचे आढळले. त्वरित पोलिसांनी त्यांना गाडीसह ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी आरोपी विरोधात भादवी कलम 34 अन्वये 37(1)135 कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कडून भारतीय बनावटीचे एक लोखंडी धातूचे पिस्तुल, एक मॅगझीन, जिवंत काडतुस व जीप गाडी नंबर एमएच 02 ईयु 5294 हस्तगत करण्यात उरण पोलिसांना यश आले. याची अंदाजे बाजारपेठेत किंमत 925000 आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय पवार हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.