सिटी बेल | पनवेल |
डंपरने दिलेल्या धडकेत 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शिवनसई येथे येथे घडली आहे. गुलाब (लता) गणेश तांबोळी असे मृत महिलेचे नाव आहे.
डंपर क्रमांक एमएच ०५ डीके २७२७ वरील चालक दगडू चंदर हिलम हा दुंदरे गावातून पनवेल बाजूस येत होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने त्याने वाहन चालवले. आणि गुलाब गणेश तांबोळी यांना ठोकर मारली. यात गुलाब तांबोळी यांचे दोन्ही पाय व कंबरेचे हाड फ्रॅक्चर झाले. व त्यांचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Be First to Comment