वाहनचोरी, घरफोडी व ऑनलाईन फसवणुकीतील आरोपींना अटक
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरण पोलीस ठाण्याचा पदभार सुनील पाटील यांनी हाती घेताच आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यांनी अवघ्या काही दिवसातच ७ वाहन चोरीच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना जेरबंद केले तसेच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना नागपूर वर्धा येथून अटक केले आहे. त्यांच्या या यशस्वी कामगिरीबद्दल
उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील व त्यांच्या टीमचे परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिनंदन केले आहे.
उरण शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे प्रमाण वाढले होते. वाहानचोरांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांसह उरण पोलिसही हैराण झाले होते. उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सुनिल पाटील यांनी सूत्रे हाती घेताच वाहनचोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पावले उचलली. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी तांत्रिक माहिती व सीसी फुटेजच्या आधारे अक्षय प्रकाश निवळकर(24) राहणार एकदंत अपार्टमेंट कामठा तसेच करण अनिल मगरे(19)राहणार साई कॉम्प्लेक्स मोठे नागाव व एक एका अल्पवयीन मुलाला जेरबंद केले. आरोपींनी वाहनचोरीच्या सात गुन्ह्यांसह एका घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींवर भादवी कलम 379,454,457,480 अन्वये गुन्हे नोंद केली असून सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपींनी ओएलएक्स अँप वर वाहनांची जाहिरात प्रसिध्द केली.त्यामध्ये वाहनांचे फोटो दाखविले व वाहनांची किंमत कमी दाखवूनऑनलाईन अनामत रक्कम घेतली होती. यानंतर त्यांनी फोन बंद करून ग्राहकांची फसवणूक केली. याबाबत तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार अधिकारी,कुणाल म्हात्रे,पाटील,दगडे, बोटे,माळ शिकारे यांच्या टीमने तपास करून त्यांनी मयूर मनोहरजी धानोरकर(24),सनी गंगाधर चोपडे(29) यांना नागपूर वरून तर मनिष ज्ञानेश्वरबाल पांडे याला वर्धा कारंजा येथून अटक केली आहे.
या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवराज पाटील यांनी उरणला प्रथमच पत्रकार परिषद घेऊन उरण पोलिसांचे अभिनंदन केले.








Be First to Comment