बहुजन मुक्ती पार्टीच्या दक्षिण रायगड तथा विधानसभा अध्यक्ष पदी जव्वाद मुकादम यांची निवड
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
देशामध्ये मागच्या अनेक वर्षापासून सर्व समाजाच्या उन्नतीसाठी काम करणारे बहुजनांचे नेते बहुजन मुक्ती पार्टीचे सर्वेसर्वा वामन मेश्राम यांच्या आदेशानुसार नुकतीच रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक माणगाव येथे पार्टीचे राज्य संयोजक एन.बी.हाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी काॅग्रेस पक्षाच्या विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पद भुषविणारे जव्वाद शकुर मुकादम यांनी सदर पक्षाचा राजीनामा देऊन आपल्या जवळपास २०० च्या वर कार्यकर्त्यांसमवेत बहुजन मुक्ती पार्टीत जाहीर प्रवेश केला असता त्याना सदर पार्टीच्या जिल्हाध्यक्ष व विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष जव्वाद मुकादम म्हणाले की देशांमध्ये अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत मात्र डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेनुसार वामन मेश्राम काम करीत असून देशातील सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन अन्यायाविरुद्धात आवाज उठविण्याचे काम आम्ही पाहत असताना त्यांच्या या भुमिकेमुळे सर्व कार्यकर्ते एकटवले असून येणाऱ्या काळात रायगड जिल्ह्यातील सर्व स्थानिक निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्याध्यक्ष मिलिंद साळवी, उपाध्यक्ष मंगेश हुमणे तर पेण विधानसभा प्रभारी म्हणून समिर घासे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.








Be First to Comment