Press "Enter" to skip to content

रायगड जिल्ह्यातून प्रथमच रायगडचा सुपुत्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकला

सिद्धेश शिंदे “अमेचॅर अलिम्पिया 2021 मेन्स फिजिक” स्पर्धेत 6 वा क्रमांक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

3-4-5 डिसेंबर 2021 रोजी बॉम्बे इकझीबीशन सेंटर गोरेगाव, मुंबई येथे अमेटर ऑलिम्पिया 2021 मेन्स फिजिक ग्रुप E चे बॉडी बिल्डर स्पर्धा मोठ्या थाटा माटात संपन्न झाले.या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे सुपुत्र सिद्धेश शिंदे यांचा 6 वा क्रमांक आला आहे.

वय 28 असलेल्या सिद्धेश शिंदे यांनी या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या टॉप 10 मध्ये 6 वा क्रमांक मिळविल्याने सिद्धेश शिंदे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून तर विविध मान्यवरांनी सोशल मीडिया द्वारे सिद्धेश शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश शिंदे यांच्या रूपाने उरणचे, रायगड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.