Press "Enter" to skip to content

जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांच्या प्रयत्नाला यश

जेएनपीटी वैद्यकीय सुविधांवर पुढील सहा महिन्यांमध्ये ५४ लाख ६५ हजार रुपये खर्च करणार

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)

जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी कोरोनाच्या महामारीत उरणच्या रुग्णांसाठी जेएनपीटी प्रशासनाकडून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता तर पुढील वैद्यकीय सुविधांवर पुढील ६ महिन्यात ५४ लाख ६५ हजार रुपये करण्याची तयारी जेएनपीटीकडून मान्य करून घेतले आहे.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जेएनपीटीने उरण तालुक्यातील रुग्णांसाठी भरपूर खर्च करणार आहे. याचा पाठपुरावा JNPT चे विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील करीत आहेत. यापूर्वी जेएनपीटीने कोविड सेंटरमध्ये १२० बेड तसेच सर्व गावांचे सॅनिटायजेशन, सर्व गावांना थर्मामीटर दिलेले आहेत.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जेएनपीटीचे हॉस्पिटल Dedicated Covid Health Center (DCHC) मध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. तेथे ऑक्सिजन पाईप लाईनसुद्धा बसविण्यात येत आहे. दैनंदिनी याचा पाठपुरावा जेएनपीटीचे विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील करीत आहेत. त्यामुळे आज जेएनपीटी हॉस्पिटलमध्ये Covid रुग्णांना ऍडमिट करण्यात येत आहे. तिथे वैद्यकीय मनुष्यबळ अपुरे आहे. त्याचासुद्धा पाठपुरावा केल्यामुळे जेएनपीटीने पुढील सहा महिन्यांमध्ये ५४ लाख ६५ हजार रुपये तरतूद केली आहे. यामध्ये ३ डॉक्टर ७ नर्सेस, ६ वार्ड बॉय व एका सुपरवायझरचा समावेश आहे. आणि लवकरच ते रूग्णांच्या सेवेसाठी रूजू होणार आहेत. त्यामुळे जेएनपीटीचे उरण तालुक्यासाठीचे योगदान भरीव झालेले आहे.
याकरिता जेएनपीटीच्या व्यवस्थापनाच्या मागे पाठपुरावा करण्याचे काम विश्वस्त कॉम्रेड भुषण पाटील करीत असल्यामुळे त्यांना उरणकर धन्यवाद देत आहेत. रात्री-अपरात्री त्यांना संपर्क करीत आहेत. तसेच दिवंगत दि.बा पाटील साहेबांचे काम यापुढे सुद्धा अविरतपणे चालू राहील. अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिलेली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.