सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी गुळसुंदे येथे सकाळच्या सुमारास महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तिच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुळसू़ंदे येथील नूतन मोरेश्वर मोकल (वय 48) ह्या सकाळच्या सुमारास मौजे गुळसुंदे हायस्कूलच्या थोडा पुढे (रसायनी बसथांब्याकडे) रस्त्यातून चालत जात असताना अज्ञात चोरटा पाठीमागून धावत आला.आणि अचानक नुतन यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावून त्यांना धक्का देवून खाली पाडून नुतन यांच्या गळ्यातील 40000 हजार किमतीची 12,330 ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली माळ गळ्यातून खेचून ओसाड मोकळ्या माळरानातून पळून निघून गेला.
याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात रसायनी पोलिस ठाण्यात भांदवि कलम 392 अन्वये गुन्हा दाखल झाला असून याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डि.गुंड अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेच्या गळ्यातून सोन्याची माळ खेचण्याचा प्रकार घडला असून असाच प्रकार अडिच ते तीन वर्षांपूर्वी या परिसरात घडल्याची चर्चा आहे तरी सध्या विवाह सोहळ्यात जाताना महिलांनी सावधानता बाळगावी असे आवाहन होत आहे.








Be First to Comment