सिटी बेल लाइव्ह /कोलाड (कल्पेश पवार)
सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली संचालित कै द.ग.तटकरे ( कोलाड हायस्कूल कोलाड ) विद्यालयचा ई दहावी चा २०२०चा निकाल ९५ % इतका लागला आहे.
गोर गरीब विद्यार्थ्यांना काँलेजचे शिक्षण सहजसाध्य व्हावे या उद्देशाने ग्रामीण भागात स्थापना करण्यात आलेल्या या विद्यालयचा दहावी परीक्षेचा दरवषी निकाल चांगला लागत आला आहे. तर विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या कै द.ग.तटकरे हायस्कूल कोलाड या विद्यालयाचा दहावीचा निकाल दि २९ जुलै रोजी लागला असून,
येथे शिकणाऱ्या प्रथम क्र.कु.सेजल उमेश बिरंगावले ९१.२०%,द्वितीय क्र.,समृद्धी समीर सानप ९०.८०% तृतीय क्र.यश राजेश साली ९०.२०% चतुर्थ क्र.,श्रीवणी संतोष खांडेकर ८८.६०% पंचम क्र. कु.जानवी दिपक मोरे ८७.२० यां विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. या क्रमांक पटकावलेल्या तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक काळे सर,घोसाळकर सर, व पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व्रुंद व विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभिनंदन व्यक्त करुन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
.






Be First to Comment