Press "Enter" to skip to content

चहाच्या टपरीवर महीला विकत होती देशी दारू

पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करून तिच्याकडून केला दारूचा साठा हस्तगत

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

चहाच्या टपरीत विनापरवाना देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या महिलेवरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करीत तिच्याकडून दारूचा साठा हस्तगत केला आहे.

करंजाडे येथील से.-1 याठिकाणी एक महिला प्लॉट नं.-159 मधील बिल्डींगच्या खाली चहाच्या टपरीमध्ये देशी संत्रा दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची माहिती वपोनि विजय कादबाने यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोनाली चौधरी, सपोनि शरद ढोले, पोलिस हवालदार चेतन पाटील व प्रतिबंधक पथकाने छापा टाकून तेथून जवळपास 1440 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.