Press "Enter" to skip to content

शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे आवाहन

शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघातील हमीभाव भातखरेदी केंद्रात विक्री करावी : मोहन शिंदे

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील शेतकऱ्यांनी पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. पोलादपूर या संस्थेमध्येच शासकीय आधारभूत किमंत हमीभाव योजने अंतर्गत भातविक्री करून हमीभावाचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन मोहन शिंदे यांनी केले.

पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील आधारभूत भात खरेदी केंद्राचे उदघाटन चेअरमन मोहन शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अजित कंक, ज्येष्ठ संचालक ढवळे, संचालक गणेश उतेकर, संचालक मनोहर पाटर्े, समाजसेवक रामदास सकपाळ, तसेच शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅनेजर विजय पवार यांनी केले.

याप्रसंगी शासकीय हमीभाव अ प्रतीच्या भातखरेदीसाठी 1 हजार 960 आणि ब प्रतिच्या भातखरेदीसाठी 1 हजार 940 रूपये हमीभाव देण्यात येणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेकवर्षांची विश्वसनीय परंपरा असलेल्या खरेदी-विक्री संघातील हमीभाव भातखरेदी केंद्रामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी मॅनेजर विजय पवार यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.