सिटी बेल लाइव्ह / उरण ( वार्ताहर)
उरणच्या पुर्व भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे यांचे वडील कै. श्री. गजानन नारायण म्हात्रे ( गुरूजी) यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटाक्यामुळे बुधवारी दुःखद निधन झाले. त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल मध्ये नेत असताना त्यांची प्राणजोत मावळली.हाँस्पीटल मधे पोहोचल्यावर तेथील डाँक्टरानी चेक करुन त्यांना मृत घोशीत केले. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पार्थिव खोपटे गावात न आणता रात्री त्यांच्यावर पनवेल येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. म्हात्रे गुरुजींच्या अशा अचानक एक्झिटने म्हात्रे कुटूंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे मात्र तरीही कोरोनाच्य पार्श्वभूमीवर कोणीही प्रत्यक्ष भेटीकरीता येऊ नये अशी विनंती मुलगे विनोद म्हात्रे , जीवन म्हात्रे यांनी केले आहे. गजानन म्हात्रे गुरुजींची दशक्रिया विधी ७ ऑगस्ट रोजी खोपटे येथील नाना नानी पार्क येथे तर उत्तर कार्यविधी ९ ऑगष्ट रोजी खोपटे धसाखोशी येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती म्हात्रे कुटूंबियांनी दिली आहे.






Be First to Comment