Press "Enter" to skip to content

माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे हल्ल्यातील आरोपी गजाआड

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

पनवेल तालुक्यातील न्हावे गावात शेकापचे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रें यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातील ३ आरोपीना न्हावा शेवा पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीना १३ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हल्ला करण्यापूर्वी जितेंद्र म्हात्रे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.परंतु तो वार म्हात्रे यांनी हाताने अडविल्याने त्यांचा जीव वाचला. हा हल्ला विक्रांत जयवंत भोईर, राकेश पाटील, गौतम गायकवाड आणि आणखी दोघे- तिघे असल्याचे जितेंद्र म्हात्रे यांनी पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी न्हावा शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विक्रांत भोईर (२७), गौतम गायकवाड ( ३५), राकेश पाटील(३४) यांना न्हावा शेवा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर भादवी कलम ३२६, ३३४,३४१, ५०५, ५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना १३ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय गणपत परचाके हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.