स्थानिक नगरसेविका मधुरा चंदन यांचे आयोजन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगर परिषद, कर्जत लसीकरण संघर्ष समिती आणि उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नगरसेविका मधुरा चंदन यांनी कोव्हीड-19 प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते, यावेळी 388 जणांनी लसीकरण करून घेतले.
शहरातील धापया मंदिराच्या सभागृहात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नगरसेविका मधुरा चंदन यांचे हस्ते लसीकरण शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी महेंद्र चंदन, युवा फ्रेंड ग्रुपचे सभासद, माघी गणेशोत्सव मंडळ पाटील आळी चे सदस्य आणि कर्जत लसीकरण संघर्ष समिती सदस्य उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका अश्विनी पाटील यांनी लसीकरण केले त्यांना मंडळाचे महेश जाधव, गौरव ठोकळे, हेमंत पवार, संतोष पिंगळे, व्यंकटेश ठाकरे, पिंट्या भोईर, महेश सारडा, अक्षय गुप्ता, यश ठाकरे, मनोज वरसोलीकर यांनी सहकार्य केली. कोव्हॅक्सिन 88 व कोव्हीशिल्ड 300 अश्या 388 जणांनी पहिला व दुसरा डोस घेतला.
Be First to Comment