विदेशी दारूचे दर अर्ध्यावर आले पण… जुना स्टाॅक संपेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा : मध्यमवर्गीय मद्यप्रेमी नाराज
सिटी बेल | मुंबई |
परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने १८ नोव्हेंबरपासून ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार, दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत. मात्र असे असले तरी मद्य विकणाऱ्या दुकानातील विदेशी दारूचा जुना स्टाॅक जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत ते नवीन स्टाॅक भरणार नाहीत. त्यामुळे उंची दारू पिणाऱ्या मद्यप्रेमींना अजून थोडे थांबावे लागणार आहे.
उंची दारू कमी पैशांत पिता यावी यासाठी काही लोकं दमण, गोवा अशा ठिकाणी जातात व येताना कमी पैशांत महागडी दारू घेऊन देखील येतात. परंतु आता काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने- आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील परदेशातून आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. दर कमी झाल्यामुळे आता तस्करीला आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील,असा दावा केला जात आहे. दरम्यान श्रीमंतांची दारू स्वस्त करत असताना ठाकरे सरकारने मध्यमवर्गीयांचा देखील विचार करायला हवा होता असा सूर निघत असून मध्यमवर्गीय मध्य प्रेमी मात्र ठाकरे सरकारवर नाराज झालेले दिसून येत आहेत.
असे असतील नवे दर
जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ५७६० तर नवीन दर – ३७५० रुपये
जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर – १९५० रुपये
जे ॲण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर – ३०६० तर नवीन दर २१०० रुपये
जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की -जुना दर – ३८०० तर नवीन दर २५०० रुपये
ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर -३०७५ तर नवीन दर – २१०० रुपये
शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की – जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये
जॉर्डन्स लंडन ड्राय जीन – जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये

















Be First to Comment