सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
रिक्त असलेल्या उरणच्या मुख्याधिकारी संतोष माळी यांची नियुक्ती झाली आहे. आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
उरण नपाचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली झाल्यानंतर हे पद तेव्हापासून रिक्त होते. आज संतोष माळी यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.
आज सायंकाळी मुख्याधिकारी पदाचा पदभार संतोष माळी यांनी स्विकारला त्यांचे नगरपालिकेतर्फे वरिष्ठ कर्मचारी अनुपकुमार कांबळे, झुंबर माने, महेश लवटे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. उरणमधील जनतेच्या समस्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू असे मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर संतोष माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.






Be First to Comment