रसायनी पोलिसांची गैरकायदा गावठी हातभट्टीवर चार महिन्यांत आठव्यांदा कारवाई
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर, पोलीस नाईक विशाल झावरे, पोलिस नाईक अजिंक्य म्हात्रे, पोलिस नाईक नंदन पाटील आदींनी कारवाई केली.
यात बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेची दोन पत्र्याच्या टाकीमध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 200 लिटर रसायन मिळून आले.सदरील रसायन जागीच ओतून नाश करून नष्ट केले.व पत्र्याची टाकी तोडून नुकसान केले.

रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळताच गैरकायदा हातभट्टी अड्डे उध्दवस्त करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.गेल्या चार महिन्यांचा कालावधीत ही आठवी घटना असून वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा हातभट्टीवर छापा टाकण्याची सहावी वेळ आहे.








Be First to Comment