Press "Enter" to skip to content

कर्जत न्यायलायनाने सुनावली शिक्षा

चोरी प्रकरणी दोन महिला आरोपींना 1 वर्षाची सश्रम कारावास

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील नेरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन महिलांनी नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांना गंडा घातला होता व त्यांच्या जवळील सोन्या-चांदीचे दागिने व भांडी पळवली होती, याबाबत नेरळ पोलिस स्टेशन च्या पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सदर महिलांना सबळ पुराव्या सह कर्जत येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चोरी प्रकरणी त्या दोन महिला आरोपींना 1 वर्षाची सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दि.19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी दरम्यान मौजे मोहाची वाडी येथील समाधान चाळ व साई मंदिर परिसरातील सुमारे 18 ते 20 महिला फिर्यादी साक्षीदार यांच्याकडून 2 महिला नवीन भांडे विक्री करणाऱ्या महिलांनी जुने भांडी त्याबदल्यात नविन भांडी देण्याचे सांगून साक्षीदार महिला यांच्या गळ्यातील, नाकातील सोने व चांदीच्या दागिन्यांची तसेच भांड्यांची डिझाईन चांगली आहे हे बघण्यासाठी मागितले, त्यानंतर या आरोपी महिलांनी साक्षीदार हे पिण्याचे पाणी आणण्याकरिता सांगितले, साक्षीदार हे पिण्याचे पाणी आणण्याकरता घरात गेल्या असता आरोपी यांनी आपापसात संगणमत करून फिर्यादी व साक्षीदार यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने स्वतः च्या फायद्याकरीता सोने व चांदीचे दागिने व भांडी असे सुमारे 1 लाख 67 हजार 900 रुपयांचा माल चोरून नेला याबाबत नेरळ पोलिस ठाण्यामध्ये दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 251/2021 भादवीसंक 379,34 गुन्हे दाखल करण्यात आले होते.

रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, सहाय्यक फौजदार गणेश गिरी, नवनाथ म्हात्रे, संदीप चव्हाण यांनी सदर गुन्ह्यातील अज्ञान महिला आरोपी यांचा सीसीटीवी फुटेज व तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास करीत असताना त्यांनी 17 ठिकाणचे सीसीटीवी फुटेज पडताळणी केली तर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार कर्जत, पनवेल, खारपाडा, मुरबाड, कल्याण, देहूरोड, पुणे या ठिकाणी जाऊन शोध घेऊन सदर गुन्ह्यातील महिला आरोपी सुलेखा नयासाल मल्हार उर्फ पूजा भांडीवाली (वय -21), सीमा श्याम सुंदर मल्हार उर्फ सीमा भांडीवाली (वय -36) दोन्ही राहणार महाराजा नगर मेहेर तालुका मेहेर, जिल्हा सतना मध्यप्रदेश सध्या राहणार मोकळे मैदान शितलादेवी नगर देहू रोड पुणे त्यांना सापळा लावून देहूरोड येथील दि.2 डिसेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.

महिला आरोपी यांनी सदरची गुन्हे केले असल्याचे कबूल केले व दि. 6 डिसेंबर 2021 रोजी 13 गुन्ह्याचे दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायालयात कर्जत येथे दाखल करण्यात आले होते सदर आरोपी यांच्यावरील गुन्हे न्यायालयाने जलद गतीने चालवण्याबाबतची विनंती करण्यात आली होती, फिर्यादी साक्षीदार व तपासणी अंमलदार यांची साक्ष पडताळणी करून आरोपी यांना गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना प्रत्येक गुन्ह्यात 1 सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 7 दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.