सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एका महिलेने आपल्या लहान मुलीला घेवून कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कळंबोली वसाहतीमधील केएल-5, सेक्टर 3 येथे राहणारी सकीना जमील शहा (23) व त्यांची एक वर्षाची मुलगी हलीमा ह्या दोघी हरविल्याची तक्रार देण्यात आली आहे. सकीना यांची उंची 5 फूट, रंग गहुवर्णीय, भाषा हिंदी, केस काळे लांब, डोळे काळे, नाक सरळ, बांधा मध्यम, चेहरा गोल असून अंगात गुलाबी रंगाची सलवार सुट व सोबत ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आहे. तर हलीमा हिचा रंग गोरा आहे.
या दोघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पो.ना.सुनील मासुळ यांच्याशी संपर्क साधावा.








Be First to Comment