Press "Enter" to skip to content

जमीनीच्या वादातून एकाची हत्या

पुतण्याने केला काकाच्या गळ्यावर कोयत्याने वार : पनवेलच्या घोट गावातील घटना

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

जमिनीच्या वादातून एका 50 वर्षीय इसमाची त्याच्याच नातेवाईकांनी हत्या केल्याची घटना पनवेल तालुक्यातील घोट गावाच्या हद्दीत घडली आहे.                 

निवृत्ती बाबू पाटील असे मृत इसमाचे नाव असून या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोट येथील सुनंदा कोळेकर व त्यांचा मयत भाऊ निवृत्ती बाबू पाटील व त्याचा मुलगा निरंजन असे गावातील पिंपळपाडा येथील चाळीच्या मागील बाजूस बोरवेलच्या पाईपलाईनचे काम करत होते.

यावेळी मोठा भाऊ बाळाराम बाबू पाटील व त्यांची दोन मुले यांनी त्याठिकाणी येऊन त्यांनी बोरवेलच्या पाईप लाईनचे काम करण्यास विरोध केला. त्यानंतर झालेल्या वादातून निवृत्ती पाटील यांच्या डोक्यावर व गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी बाळाराम बाबू पाटील, नितीन बाळाराम पाटील, मनोज बाळाराम पाटील यांच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.          

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.