सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (मनोज पाटील )
पेण तालुक्यातील तालुक्यातील रावे या गावात पाताळगंगेच्या तीरावर वसलेल्या सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे या विद्यालयाला उत्कृष्ट निकालाची परंपरा आहे. यापूर्वी अनेकदा शाळेचा निकाल100% लागला आहे या वर्षी पुन्हा ही परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2019 -20 चा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल 100%लागला आहे.
या परीक्षेसाठी सेमी इंग्रजी माध्यमासाठी 29 विद्यार्थी तर मराठी माध्यमासाठी 38 असे एकूण 67 विद्यार्थी बसले होते यापैकी 24 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे 29 विद्यार्थी हे प्रथम श्रेणी प्राप्त आहेत तर 14 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणी प्राप्त आहेत .यामध्ये प्रथम क्रमांक टावरी कुमार नरदास 84 .80 द्वितीय क्रमांक पाटील तमन्ना ज्ञानेश्वर 84% तर तृतीय क्रमांक पाटील अकांक्षा बाळकृष्ण 82.20 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व शाळेच्या उत्तम यशासाठी ज्यादा तासिका ,युनिट टेस्ट ,विविध पॅटर्नच्या सराव परीक्षा ,मॉर्निंग स्टडी असे विविध प्रकारे प्रयत्न केले गेले विद्यालयाला लाभलेले कुशल असे मुख्याध्यापक माननीय श्री शेंडगे एस. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही .
.एस .पाटील ,मोकल डी.व्ही .मॅडम,कुंभार एन. एम., वरणकर मॅडम,ठाकूर एस. के., पाटील एम. टी. शिक्षक प्रतिनिधी आर. डी. पाटील, भोईर एन. आर., म्हात्रे एच. पी., पाटील आर. जे., म्हात्रे के. ए.,गावंड जे. पी., एस. एन. मॅडम, एच.एच.पाटील मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम कामगिरी केली.
त्याच बरोबर ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री.बी.आर.पाटील साहेब व सर्व पदाधिकारी व सदस्य,शाळा समिती अध्यक्ष मा. श्री.आर. बी.पाटील साहेब,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांनी वेलो वेळी घेतलेल्या सभा, चर्चा सत्र हे देखील या यशाचे गमक आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीसाठी व शाळेच्या उत्तम यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक होत आहेत तसेच वेलो वेळी मार्गदर्शन करणारे कोपर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. जे. एस.म्हात्रे सर व सुधागड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री.वसंतराव ओसवाल साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.रवींद्र लिमये व सचिव मा.श्री. रविकांत घोसाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.






Be First to Comment