भाजप नेते एकनाथ देशेकर यांची कन्या जागृती देशेकर ची दहावी परीक्षेत चमकदार कामगिरी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे रायगड जिल्हा अध्यक्ष, तथा चिंध्रण चे सरपंच एकनाथ देशेकर यांची कन्या जागृती नुकत्याच लागलेल्या एसएससी बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केल्यामुळे हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जागृती पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके विद्यालयात शिकत घेत होती. सेमी इंग्रजी माध्यमातून दहावीची परीक्षा देत तिने 90.60 टक्के गुण प्राप्त केले. तिच्या देदीप्यमान यशा बद्दल समजताच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकुर, शिवसेनेचे पमपा जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या सह अनेक मान्यवरांनी चिंध्रण येथील निवासस्थानी जाऊन जागृतीचे आणि तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.






Be First to Comment