सिटी बेल | पनवेल | संजय कदम |
टाटा टेंपोमध्ये भरलेले भंगार सामान चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रेमचंद डांगी यांचे रिद्धी सिद्धी बिल्डींग, शॉप नं- 6 व 7 पनवेल याठिकाणी दुकान असून त्यांच्या दुकानासमोर त्यांनी टाटा टेंपो उभा केला होता व त्यामध्ये विविध प्रकारचे लोखंडी पाईप, एलबो, चारचाकी वाहनांची क्लचप्लेट असे हजारो रूपयांचे सामान ठेवले होते. सदर माल एका गोणीत भरून ठेवला होता. त्या मालाची चोरी आरोपी शादाब मेमन (वय-23) याने केली असता पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील गिरी, दिपक शेळके आदींच्या पथकाने सदर आरोपीस ताब्यात घेतले आहे.








Be First to Comment