शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी केले कुटूंबाचे सांत्वन
सिटी बेल लाइव्ह / खोपोली ( संतोषी म्हात्रे )
तन्ना स्टोर्सची शंभर वर्षांची परंपरा जपणारे, तसेच व्यापार करताना सामाजिक बांधिलकी जपणारे किशोर गोवर्धन तन्ना ७१ यांचे रविवारी आजाराने निधन झाले असून शेकापक्षाचे नेते आम.जयंत पाटील यांनी भेट देवून तन्ना कुटूंबाचे सांत्वन केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, संतोष जंगम,अँड.रामदास पाटील, दिनेश गुरव,जयंत पाठक,राजू अभाणी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
खोपोली शहराचे प्रथम शासन नियुक्त नगराध्यक्ष गोवर्धन पु तन्ना यांचे किशोरभाई ज्येष्ठ चिरंजीव होते. आपल्या वडीलांच्या पावलांवर पाऊल ठेवून किशोरभार्ई यांनी दुकान सांभाळताना सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली मग ते शहराचे विकासाचे प्रश्न असो की, रेल्वेच्या समस्या असो, थेट संबंधीत खात्याच्या मंत्रीमहोदयांना लेखी पत्रव्यवहार करून दखल घेण्यास भाग पाडत असे. खोपोलीत लोकल ट्रेन आणण्यात तन्ना परिवाराचे प्रयत्न आहेत. त्यामुळे किशोरभाईंना नेहमी सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे व्यापार करताना, जनतेशी थेट संबंध असणारे ते खोपोलीतील एकमेव व्यापारी असावेत असे बोलले जाते, त्यांच्या निधनाने खोपोलीतील चांगला व्यापारी, चांगला कार्यकर्ता खोपोलीकर मुकल्याची भावना आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.






Be First to Comment