Press "Enter" to skip to content

कैरे गावात एकावर चाकू हल्ला : आरोपीला अटक

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

क्षुल्लक कारणावरून एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना रसायणी पोलीस ठाण्याचे हद्दीत केले गावात घडली. या घटनेतील आरोपी सिद्धी रामकृष्ण सावद (वय 48 वर्ष राहणार कैरा, ता.खालापुर)
याला पोलीसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनानाथ भरत सहानी (रा.कैरा गाव खालापूर) हा घरात झोपला असताना सिद्धी रामकृष्ण सावद हा गेटला लाथ मारुन आतमध्ये येवुन दिनानाथ व त्याचे मित्र यांना शिवीगाळ करुन कामाला चला असे बोलला.त्यावेळी दिनानाथ याने एवढ्या लवकर अशी विचारणा केली. सिद्धी याने रागाने दिनानाथ ला चापट मारली. दिनानाथ ने प्रतिकार केल्याचा राग येवून सिद्धी याने बाहेर जावुन चाकु आणला. हातातील चाकुने दिनानाथ याचे छातीवर वार केला.

दिनानाथ गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवु लागल्याने सोबत राहाणार रोशन कुमार हा त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपी सिद्धी याने रोशनला देखील मारहाण केली.जखमी दिनानाथ सहाणी याला अष्टविनायक हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोपी सिद्धी रामकृष्ण सावद याला रसायनी पोलीसांनी अटक केली आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास पोउनि वायगणकर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.