बायोडिझल भरलेल्या चार टँकर वर कारवाई : २२ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
सिटी बेल | पनवेल|
उलवे नोड बंबावीपाडा येथे पुरवठा विभाग पनवेल ने मध्य रात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली. यात बायोडिझल या ज्वलनशील पदार्थाने भरलेले चार टँकर जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे २२ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी संजयकुमार गुप्ता व श्रावण पेमईकुमार यांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात तर एक आरोपी फरारी आहे. सदर कारवाई पुरवठा निरीक्षण आधीकारी प्रदिप कांबळे, नायब तहसिलदार एकनाथ नाईक, कारकुन हसन कमळीवाळे, मंडळ आधीकारी नेरे सुनील पाटील, तलाठी आदींच्या पथकाने केली आहे.








Be First to Comment