साईनाथ पवार यांच्या जिद्दीला सलाम
सिटी बेल | बोर्लीमांडला | अमूलकुमार जैन |
साईनाथ पवार यांचा जन्म १९/९/१९८१ साली एका सामान्य कुटुंबात झाला वयाच्या दुसऱ्यावर्षी ताप येउन पोलीओ ने दोन्ही पाय गेले . लहानपणा पासूनच शिक्षणाची आवड आणि त्यातच आईवडीलाची सात मिळाली इयत्ता १० वी पर्यंतच शिक्षणासाठी आईने रोज उचलून पठीवर घेऊन शाळेत नेआण करुन शिक्षण केले.सन 1995 मध्ये दोन्ही पाया वर मुंबई येथे आखिल भारतीय भैतिक चिकित्साल हाजी अली,येथे शस्त्र क्रिया केल्याने त्याना स्वतः च्या पायावर उभा रहायला लागले.
शस्त्रक्रिया करण्याआदी हातावर लहान मुलांच्या सारखे रागात होते .नातेवाईक, शेजारी सारेजण सागायचे शस्त्रक्रिया केलीस तर मरशील अशी भिती दाखवली पंरतु कोणत्याही भिती ला नघाबरता अस रोज घसरत मरण्यापेक्षा काही होऊदे म्हणून शस्त्रक्रिया केली.
पुढील पदवी पर्यंत चे शिक्षण घरापासून १० किमी अतंरावर अलिबाग येथे छोटा भाऊ वैजनाथ व मित्र सुरज नाडकर,इरफान लोकरे यांच्या मदतीने पुर्ण केले. अथक परीश्रमाने रायगड जिल्हा परिषद येथे भरती प्रक्रियेत निवड होऊन सेवेत रुजू झाले . सा.प्र.विभाग, ग्रामपंचायत विभाग, बाधकाम विभागात त्यानी काम केले आणि आता ते समाज कल्याण विभागाच्या अपंग कल्याण कक्षात कार्यरत आहेत.
स्वतः अपंग असल्याने आपल्या ला मिळालेल्या संधीचे त्यांनी सोन केले .जिल्ह्यातील सर्व अपंगांना एकत्र करुण प्रत्येकाला स्वावलंबी बनवीन्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. स्वतः 90%अपंगत्व असताना अपंत्वावर मात करुन जिद्दीने अपंगांच्या न्याय हक्का साठी संघर्ष करीत आहेत. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य राज्याध्यक्ष, पद , ते उत्तमरित्या पारपाडीत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन 2016 ला जिवन गैरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच कोव्हिड व महापुरात दिव्याग बांधवांना मोलाचं सहकार्य केले आहे. 90% दोन्ही पायानी अपंग असताना अपंगत्वावर मात करुन स्कुटर आँडपशन करुन चालवत आहेत तसेंच फोर व्हिलर मध्ये फेरफार करून हँड कट्रोल यंत्रणा बसुन स्वतः चालवीत आहेत.
त्यांच्या जिद्दीला सलाम ते शरीराने अपंग आहोत मनाने नाही जिद्द,चिकाटी,आणि आत्मविश्वास हा त्यांचा नसानाशात आहे. आणि त्यातूनच ते कोणत्याही संकटाला हसत हसत सामोरे जात आहेत.
Be First to Comment