पेण तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा बंद : गणेश मूर्ती कामात खंड
सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार)
पेण तालुक्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्याच प्रमाणे वीज ग्राहकांना विद्युत मंडळाकडून अवास्तव वीजबिल आकारले जात असल्याने वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने त्याचा फटका गणपती कारखानदारांना बसत आहे. यापुढे विद्युत मंडळाने वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर मनसे तीव्र आंदोलन छेडेल असा मनसे इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव रुपेश पाटील यांनी संबंधित विद्युत मंडळाला निवेदन देऊन दिला आहे.
कोरोना वायरस ने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे अनेकांच्या नोकऱ्या यात धोक्यात आल्या आहेत अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणपती कारखानदार व कारागीर आहेत निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांच्या घराचे तसेच गणपती कारखानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गणपती उत्सव जवळ आल्याने गणपती कारखान्यात जोरात मूर्ती घडविण्याचे काम चालू आहे परंतु वारंवार खंडित होत असलेल्या विद्युत पुरवठा यामुळे कामात खंड पडत असल्याने एकीकडे अवाजवी बिलांची आकारणी आणि दुसरीकडे मात्र व्यवसाय नाही अशा दुहेरी कात्रीत मूर्तिकार सापडला आहे.
पेण मध्ये मूर्ती कारखान्यांवर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने पेण तालुक्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होऊ नये याकरिता आवश्यकती उपाययोजना तातडीने करावी तसेच ग्राहकांना योग्य ती वीज बिले देण्यात यावी अन्यथा जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पेण विद्युत महामंडळाला निवेदन देऊन मनविसे सचिव रुपेश पाटील यांनी दिला आहे






Be First to Comment