रोह्यात आज सापडले १७ नवीन रुग्ण
सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार)
रोहे तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून,आज नव्याने १७ नवे रुग्ण पाँझिटिव्ह सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्ण संख्या ही ५५१ वर पोहोचली आहे.तर आतापर्यंत कोरोना संसर्गाने म्रुत्य पावल्यांची संख्या ही १५ वर जाऊन पोहोचली आहे.
रोहे तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे.त्यात रोज नवीन रूग्ण सापडू लागल्याने ग्रामीण भागासह शहराचेही टेन्शन वाढू लागले आहे.कोरनाचा वाढता प्रकोप पाहता शहरासह ग्रामीण भागातही चिंतेचे व भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
आज तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार रोहे तालुक्यात आज नव्याने १७ नवे रूग्ण सापडल्याने तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ५५१ वर पोहोचली आहे.सध्या १४४ रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत तालुक्यात १५ जण मयत झाले आहेत.तर ३४४ रूग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
तालुक्यात कोरोनाचा वाढत चाललेला प्रकोप म्हणजे सा-यांचीच डोकेदुखी ठरत आहे. तर रोजच्या आकडेवारीने सारेच चक्रावले आहेत.खबरदारीचा उपाय म्हणुन नागरिकांनी घरीच राहा सुरक्षित रहा व आपल्याबरोबर आपल्या परिवाराचेही संरक्षण करा असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.






Be First to Comment