करोनामुळे उरण मधील पावसाळी खेळाचा आंनद मावळला : मैदाने पडली ओसाड
सिटी बेल लाइव्ह / उरण/ रमेश थळी #
पावसाळ्यात उरण तालुक्यातील मैदानात फुटबॉल खेळाचा आंनद घेणारे अनेक खेळाडूंचे फुटबॉल संघ आहेत. हे संघ दरवर्षी आॅगष्ट महिन्यात द्रोणागीरी एसोशीयशन स्पोर्ट तर्फे सुरू होणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव करतात.
गो ना अक्षीकर विद्यालय मैदान, वीर सावरकर मैदान या मैदानावर फुटबॉल खेळणारे तालुक्यातील संघ फुटबॉल खेळाचा सराव करत. मात्र यावर्षी कोरोनाच्या पादुर्भावामुळे मैदानी खेळावर बंदी असल्याने पावसाळी खेळ होणार नाहीत. त्यामुळे हा सराव होत नसल्याने मैदानावर गवताचे साम्राज्य वाढताना दिसत आहे. पावसाळी खेळ बंद असल्याने ही मैदाने ओसाड पडली आहेत.






Be First to Comment