Press "Enter" to skip to content

जीएसटी नंतर आता हॉलमार्किंगच्या सक्तीने सोनार मेटाकूटीस

रायगड जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग सेंटरची सुविधाचं नसल्याने सोनारांपुढे प्रश्न चिन्ह

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा सोन्याचा दागिना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे 32 मणांचे सिंहासन आणि ते सिंहासन घडविण्यासाठी रायगड जिल्हयातील पोलस्यपूर म्हणजे पोलादपूर येथे कर्नाटक हुब्बळी येथील सोनारकामाचे कारागिर आणले गेले. आध्यात्मिक वृत्तीचे सोनार हेच चांगल्या दर्जाचे दागिने घडवू शकतात म्हणून याकामी कडकलक्ष्मी देवीभक्तांचा उपयोग केला गेला. सोने या धातूला स्वच्छ करून दागिने घडविताना त्याची तन्यता आणि वर्धनीयता या गुणधर्माचा पुरेपूर वापर करणारा कारागिर हा सोनारकामातील तरबेज मानला जातो. मात्र, आज कालांतराने या व्यवसायावर राज्यकर्त्यांची खप्पामर्जी होऊ लागली आहे. नोटाबंदीवेळी ज्या सुवर्णनियंत्रण कायद्याची चर्चा झाली. त्यादृष्टीने पाऊले उचलायची भूमिका न घेता चक्क सुवर्ण कारागिरांची कोंडी करण्याची भूमिका अस्तित्वात येऊ लागली आहे. याआधीच जीएसटी मध्ये हा व्यवसाय आला असताना सोनारकाम करणाऱ्या सराफी व्यावसायिक पिडले गेले असताना आता हॉलमार्किंगच्या सक्तीने हा व्यवसाय मेटाकूटीस येणार आहे. या हॉलमागि पध्दतीच्या अवलंबण्याने सर्वसामान्य कारागिरांना सोन्याचे दागिने घडविण्याचे पारंपरिक व्यवसायाला परिवर्तनानंतर या नव्या पध्दतीने परिपूर्ण करावे लागणार आहे.

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) सहकार्याने सोनार व्यावसायीक, ज्वेलर्स, सुवर्णकार कारागीर बांधव यांच्यासाठी शासकीय नियमांचे योग्य आणि अचुक मार्गदर्शन, सहकार्य व्हावे यासाठी सुवर्णकारांच्या विविध संघटना कार्यरत आहेत. यामध्ये हॉलमार्किंग सेंटर नजिकच्या जिल्ह्यांमध्ये असल्यामुळे सर्वांना बीआयएस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ज्यांनी बीआयएस मध्ये रजिस्ट्रेशन केलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर ओल्ड हॉलमार्किंग स्टॉक डिक्लेरेशन करायचा आहे.

यापूर्वी ज्यांनी बीआयएस मध्ये रजिस्ट्रेशन केलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर ओल्ड हॉलमार्किंग स्टॉक डिक्लेरेशन करायचा आहे. डिक्लेरेशन साठी साठी लागणारी वेबसाईट [email protected] अशी आहे.
ज्यांनी अजून हॉलमार्किंग ओल्ड स्टॉक डिक्लेरेशन केलेले नाही, अशा दुकानांमध्ये व्हिजिट झाल्यानंतर अधिकारी बीआयएस डिपार्टमेंट कळवणार आहेत. त्यांच्याकडून आलेल्या नोटीस पुन्हा उत्तर द्यावे लागणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये 1 डिसेंबर पासून जी दुकाने बीआयएस कडे रजिस्टर आहेत त्या दुकानांमध्ये अधिकारी व्हिजिट करणार आहेत प्रत्येक दुकानातून 1 सॅम्पल असे दिवसाला पाच सॅम्पल कलेक्ट करणार आहेत. ज्यांचं दुकान बीआयएसमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी दुकानांमध्ये बोर्डवरती बीआयएस मानक पथप्रदर्शकचा लोगो कंपल्सरी लावणे बंधनकारक आहे.

दुकानांमध्ये वजन काटा 0.01 चा असणे बंधनकारक आहे. हॉलमार्किंग लोगो कस्टमर न दाखवण्यासाठी दुकानांमध्ये दुर्बिण ठेवणे बंधनकारक आहे.दुकानांमध्ये दोन ग्राम च्या वरती सर्व मार्ग हॉलमार्किंग ठेवणे बंधनकारक आहे.अधिकारी कोणताही सॅम्पल म्हणून घेऊ शकतात. दुकानांमध्य बीआयएस सर्टिफिकेट दिसेल अशा ठिकाणी लावायचा आहे. ज्यांना बीआयएसमध्ये रजिस्ट्रेशन अजून केलेले नाही. त्यांच्या माहितीसाठी बीआयएस सर्व फी माफ केली आहे. 2 गॅ्र्रमच्या खालील दागिन्यांना हॉलमार्किंग बंधनकारक नाही. ज्यांचं दुकान बीआयएसमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी दुकानांमध्ये बोर्डावर बीआयएस मानक पथप्रदर्शक चा लोगो कंपल्सरी लावणे बंधनकारक आहे. दुकानांमध्ये वजन काटा 0.01 चा असणे बंधनकारक आहे. 1 डिसेंबर पासून अधिकारीवर्ग फिरताना जर कोणाकडे बीआयएस रजिस्ट्रेशन नाही. पण दुकान चालू आहे. त्यांच्यासाठी दोन लाखाच्या वर दंड आहे आणि कायदेशीर शिक्षेसाठी पात्र आहेत.

ऑल इंडिया ज्वेलरी ऍंड गोल्डस्मिथ फेडरेशनचे प्रेसिडेंट पंकज अरोरा यांच्यामते, केंद्र सरकारने ज्वेलरी सराफी व्यवसायासाठी दोन वेळा बीआयएस मानक होण्यापासून सवलत दिली होती. मात्र, आता फेडरेशनकडून सरकारकडे अवधी मागितलाही जाणार नाही आणि सरकार अवधी देणारही नाही. त्यामुळे यापुढे बीआयएस मानक घेण्यापासून गत्यंतर नाही. पूर्वीप्रमाणे स्वैर व्यवसाय करण्याचे टाळून सुवर्णकारांनी आता नियमांप्रमाणे व्यवसाय करून उत्कर्ष साधायचा असला तरी सोनार कामातील सोन्याचे सॅम्पल गोळा करणारे अधिकारी मोठया प्रमाणात सोनारकामाला धोका निर्माण करून दंड आणि गुन्ह्याचा धाक दाखवून लुटमार करू शकणार आहेत. यामध्ये तोतया अधिकारीदेखील मोठया प्रमाणात हातकी सफाई दाखवून सराफी व्यवसायिकांना गंडा घालणार अथवा बदनामी करण्यास कारणीभूत ठरणार आहेत. मात्र, योग्य सरकारी अधिकारी देखील हॉलमागि नसलेल्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सराफी व्यावसायिकावर धाडी घालून विना हॉलमागिच्या सोन्यापासून बनविलेल्या दागिन्यांवर जप्ती कारवाई करू शकणार आहेत.

1 डिसेंबरपासून केवळ 18,22,24 कॅरेटस् सोन्याचे हॉलमार्किंगचे दागिने विकता येणार आहेत. गेल्या 1 जून पासून गोरखपूरसहित 256 शहरांमध्ये हॉलमागिचे नियम लागू करण्यात आले आहेत. व्यापाऱ्यांच्या मागणीवरून सरकारने सर्वांना लवकरात लवकर सर्व दागिने हॉलमागिचे करण्यासाठी सवलत दिली होती. राजकोट, कोलकता, मुंबई, दिल्ली आणि कोईंम्बतूर येथील व्यापारी गोरखपूर सराफा बाजारातून दागिने खरेदी करीत असतात. दरवर्षी 40 लाखांचा टर्नओव्हर रजिस्ट्रेशन करण्याची अपरिहार्यता असल्याने व्यापारीवर्गासाठी हा नियम आता अधिकच जाचक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राजकोट, कोलकता, मुंबई, दिल्ली या शहरात गोल्ड मॅन्यूफॅक्चरिंग हब आहेत. पूर्वी सर्वत्र केडीएम सोन्याचे सोल्डरिंग म्हणजे डाग लावण्याचे काम सुरू असायचे ते आता हॉलमागिमुळे इडियम सोन्यापासून सोल्डरिंग करण्याची गरज आहे.

या नवीन नियमांची अंमलबजावणी केवळ सराफी व्यावसायिकांपुरतीच नसून यासंदर्भात ग्राहक जागृतीचीही गरज निर्माण होणार आहे. यापुढे ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमागिचे दागिनेच खरेदी करण्याची गरज आहे. यासाठी पक्की पावती आणि एसक्यूआयडी दुकानदार सुवर्णकार व्यावसायिकाकडून घेण्याची गरज आहे. दागिन्याची शुध्दता आणि कॅरेट पावतीवर नमूद असण्याची गरज असून बीआयएसचा त्रिकोणी हॉलमार्क दागिन्यावर दिसून आला पाहिजे. लेस मार्कचा शिक्का बिलावर दिसून येण्याची गरज आहे.

ग्राहकाला संशय वाटल्यास त्याने दागिन्याची हॉलमार्किंग सेंटरवर तपासणी करून घेतली पाहिजे. कोणी सराफी व्यावसायिक ग्राहकाला खोटे बिल अथवा पावती देत असेल तर ग्राहकाने तक्रार करण्याची गरज आहे. दागिन्यावर कोणत्यावर्षी हॉलमागि झाले, दुकानदाराची माहिती, कोणत्या हॉलमागि सेंटरमधून झाले, कॅरेटस आणि शुध्दता तसेच त्रिकोणी बीआयएस मागि अशा पाच प्रकारच्या उल्लेखाचा समावेश असतो. कॅरेटस् म्हणजे शुध्दतेचे परिमाण असून सोने 14 कॅरेटस् म्हणजे 58.5 टक्के, 18 कॅरेटस् म्हणजे 75 टक्के, 22 कॅरेटस् 91.6 टक्के आणि 24 कॅरेटस् म्हणजे 99.99 टक्के शुध्दता गृहित धरली जात असते.

सुवर्णखरेदीसाठी ग्राहक जसा सुज्ञ असावा तसाच सुवर्णकारदेखील प्रामाणिक ग्राहकहित साधणारा असावा अशी अपेक्षा असताना बीआयएस मानकाची अंमलबजावणीमुळे नोकरशाहीकडून गैरअर्थ काढला गेल्यास सोनाराची व्यावसायिक प्रतिष्ठा धुळीस मिळेल, सॅम्पलच्या नावाखाली सोनाराची लुबाडणूक होईल किंवा ग्राहकाची फसवणूक करण्यासाठी सुवर्ण कारागिर, विक्रेते, व्यावसायिक आणि बीआयएस अधिकारी यांच्या साटेलोटयातून मोठया प्रमाणात ग्राहकांना लुटलं जाऊ शकणार आहे. यामुळे कालांतराने सुवर्णखरेदीसाठी ग्राहकांनी पाठ फिरवून अनुत्सुकता दाखविल्यास या व्यवसायाला अखेरची घरघर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग सेंटरची सुविधा नसल्याने 1 डिसेंबर 2021 पासून सुरू झालेल्या या हॉलमार्किंग सक्तीचा अंमल सुरू झाल्यानंतर अतिरेक होऊ नये, अशी अपेक्षा रायगड जिल्ह्यातील सराफी व्यावसायिकांची संघटना करीत आहे. मात्र, अलिकडेच सुवर्णकारांची संघटना संघटीत होत असल्याने अद्याप संघटनेमध्ये सुसुत्रता आली नसल्याने रायगड जिल्ह्यातील सोनार व्यावसायिकांमध्ये या हॉलमागिच्या सक्तीच्या अंमलाबाबत फारच भितीचे वातावरण दिसून येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.