सिटी बेल लाइव्ह / खालापूर,(बातमीदार)
यंदा दहविच्या निकालात तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा मान जनता विद्यालय खोपोलीच्या निनाद कचरू चौधरी याने पटकाविला असून त्याला 97.20 टक्के गुण मिळाले आहेत.खालापूर तालुक्याचा एकूण निकाल 93.03 टक्के लागला आहे.तालुक्यातून अङतीस शाळेतून 2570 विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते.त्यापैकी 2391 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.635 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उतीर्ण झाले आहेत. 873 विद्यार्थ्याना प्रथम श्रेणी तर व्दितीय श्रेणीत 656 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. 227 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तालुक्यातील बारा शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल 55.26टक्के शाहू महाराज माध्यमिक शाळा वासरंग आणि खरसुंङी येथील द.शि.जाधव शाळेचा 61.90 टक्के लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंङळाचे अध्यक्ष संतोष जंगम,गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब पोळ,दिलासा फाऊंङेशन खालापूर यानी अभिनंदन केले आहे.
तालुक्यातील सर्वाधिक टक्केवारी मिळविले एक ते पाच क्रमांक गुणवंत विद्यार्थी.
1)निनाद कचरू चौधरी-गुण-97.20(जनता विद्यालय खोपोली)
2)श्रेया अंकुश दहिगुङे-96.40(कारमेल खोपोली)
3)शिवम गोरक्ष दहिफळे-95.60(रिलायन्स फाऊंङेशन लोधीवली)
अविष्कार जगदिश लबङे-95.60((रिलायन्स फाऊंङेशन लोधीवली)
4)आखिल विनोद गुप्ता-95.00(वसंत मेमोरियल स्कूल खोपोली)
5)सिद्धी नलिन शहा-94.80,तहसिन हमिद शेख-94.80,गिरिष पंकज शर्मा-94.80,दिव्या अजय नाम्बियार-94 80(सर्व-कारमेल स्कूल खोपोली)






Be First to Comment