Press "Enter" to skip to content

पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत कुणाल विचारे याला रौप्य पदक

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील क्षेत्रातील रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापन पदाधिकारी संतोष विचारे यांचा पुतण्या कुणाल संदिप विचारे याने पाॅवर लिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक पटकावले.

नेरुल येथील डी.वाय.पाटील काॅलेजचा व्दितीय वर्षात शिकणारा कुणाल संदिप विचारे याने हैदराबाद येथे झालेल्या पाॅवर लिफ्टिंगमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले.कुणालने सब ज्युनिअर गटात व्दितीय क्रमांक मिळवून रौप्य पदक प्राप्त केले. कुणाल विचारेच्या या यशाबद्दल त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.