ऑनलाइन नोंदणी करतांना अडचणी
शेवटचा एक दिवस शिल्लक, बळीराजा हवालदिल
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सरकारी काम अन बारा महिने थांब या म्हणीचा प्रत्येय आता येऊ लागला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेची खरीप हंगामाची अंतिम मुदत 31 जुलै पर्यँत आहे. मात्र पोर्टल धीम्या गतीने चालत असल्याने ऑनलाइन नोंदणी करतांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. नवनवीन उपक्रम , शासन योजना अंमलात आणण्यासाठी ऑनलाइन नोंदणी चा पर्याय दिला असला तरी प्रत्येक्षात सेवा केंद्राच्या संचालकांना याचा मनस्थाप होताना दिसतोय.
पोर्टलवर शेतकऱ्यांचे ॲानलाईन नोंदणी करतांना 7/12 व क्षेत्र पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र पडताळी करण्यासाठी प्रत्येक अर्जासाठी एका 7/12 साठी कीमान 5 ते 10 वेळा प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे पिकविम्याचे फाॅर्म नोदंणी करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी अर्ज नोंदणीसाठी खूप वेळ देखील लागत आहे. कृषी विभागामार्फत योजनेची माहीती उशीरा दिल्याने शेवटचे दोन दिवस बाकी असतांना शेतकरी केंद्रावर पिकविम्याचे अर्ज भरण्यासाठी येत आहेत. मात्र पोर्टलच्या अनिश्चीतेमुळे शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात अडचणी येत आहेत. असे आपले सरकार सेवा केंद्र ( CSC ) स्वयंम डिजीटलचे संचालक – निलेश शिर्के यांनी सांगितले.






Be First to Comment