सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र याच्या मार्फत महाराष्ट्र (दिव्यांग) पॅरा कब्बडी संघाचे निवड शिबिर वांवढळवाडी,(चौक फाटा जवळ), ता, खालापूर,,रायगड,,रामदास काईनकार यांच्या वीटभट्टी मैदानावर दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते.यामध्ये बस सेवा संप सुरू असल्याने महाराष्ट्रातील ३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यापैकी रमेश संकपाळ (कर्जत-रायगड), मंगेश म्हात्रे(पेण-रायगड),ओमकार महाडिक (महाड-रायगड), अक्षय निकम (रोहा-रायगड), राजन भरताव (मुंबई), राजा मोकल(पेण-रायगड), मुकुल खाडे (पेण-रायगड),रायसिंग वसावे ( नंदूरबार), महेश वसावे (नंदूरबार), अशिफ शेख (सांगली) ज्योतिराम कदम (सांगली) विजय वळवी(नंदूरबार) , यांची अजमेर राज्यस्थान येथे 27 ते 29 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा कब्बडी स्पर्धा 2021 साठी निवड करण्यात आली आहे.
यापैकी रमेश संकपाळ याची कर्णधार, मंगेश म्हात्रे यांची कोच कम खेळाडू, कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन महाराष्ट्र व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड, महाराष्ट्र चे सचिव शिवाजी पाटील यांची टीम व्यवस्थापक व संकल्प अपंग संघ मुंबई चे अध्यक्ष बाबाराव धोत्रे यांची सहाय्यक म्हणून निवड करण्यात आली आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कुलाबा दिव्यांग क्रिडा असो. महाराष्ट्र तथा सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रोहा रायगड महाराष्ट्रचे सचिव शिवाजी पाटील, कुलाबा दिव्यांग क्रिडा असो. महाराष्ट्र अध्यक्ष शशांक हिरवे, रायगड जिल्हाध्यक्ष कल्पेश तवले, फिजिओथेपिस्ट व सहव्यवस्थापक सुनिल पाटील, खालापूर तालुक्यातील दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते मंगेश पार्टे, निवड समिती सदस्य रमेश संकपाळ, मंगेश म्हात्रे व ज्यांनी मैदान उपलब्ध करून दिले असे रामदास काईनकर आणि रवि काईनकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले असे असोसिएशनचे सचिव शिवाजी पाटील यांनी सांगितले.








Be First to Comment