Press "Enter" to skip to content

अपघातात इसमाचा मृत्यु

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने एका 40 वर्षीय इसमास ठोकर मारून त्यात त्याला जखमी करून त्यात त्याचा मृत्यु झाल्याने सदर इसमाचा शोध पनवेल तालुका पोलिस करीत आहेत.

पनवेल जवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, पुणे लेन 7/455 किमी वर एका अनोळखी वाहनानेै सदर इसमास ठोकर मारली आहे. सदर इसम निम गोरा, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच असून अंगात लाल रंगाचा टिशर्ट त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या व राखाडी रंगाची फूल पॅंट घातली आहे. या मयत इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाणे-27452444 किंवा सहा पोलिस निरीक्षक विवेक भोईर यांच्याशी संपर्क साधावा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.