शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्या कविता म्हात्रे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केली मदत
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
जगभरात व आपल्या देशात कोरोना व्हायरस, (covid-19) या आजाराने मोठा उच्छाद मांडला आहे, महाराष्ट्र राज्यात सुद्धा या आजाराचा प्रसार वाढत आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे सन्मानीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मोठ्या खंबीरपणे सदर संकटाचा सामना करत आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर एक सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेच्या जासई ग्रामपंचायत सदस्य सौ.कविता निलेश म्हात्रे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ हजार रुपयांचा धनादेश शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कडे सुपूर्द केला आहे. यावेळी सोबत निलेश म्हात्रे उपस्थित होते.
अशाच उदार व्यक्तीमत्वाच्या माणसांची या महाराष्ट्राला आज गरज आहे असे माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सांगितले.






Be First to Comment