Press "Enter" to skip to content

शिष्यवृत्ती परीक्षेत वडघर हायस्कूलचे सुयश

भूमी धुमाळ व श्रुष्टी पवार यांना शिष्यवृत्ती प्राप्त

सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम |

महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांनी १२ ऑगस्ट रोजी घेतलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित सरस्वती विदया मंदिर वडघर मुद्रे,ता.माणगाव ,जिल्हा- रायगड तथा कै.शंकर सिताराम विदया संकुलच्या कु.भूमी हरिश्चंद्र धुमाळ व कु.श्रुष्टी भिवा पवार या दोन विदयार्थ्यांनींनी शिष्यवती प्राप्त केली आहे . शाळेतून एकूण ८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्या आहेत.

या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली धारसे,शाळा समिती अध्यक्ष मा.श्री.महादेव जाधव, सदस्य विजय सावंत यांनी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

या दोन्ही विद्यार्थ्यांनी अत्यंत हुशार, चाणाक्ष, जिज्ञासू, आज्ञाधारक, प्रामाणिक, उत्तम वक्तृत्व शैली अशा असंख्य गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनींचे मांजरवणे पंचक्रोशी व संपूर्ण तालुक्यातून शिक्षण प्रेमींकडून अभिनंदन केले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.