खासदार नारायण राणे यांच्या टीकेला शिवसेनेच्या वाघिणीने दिले सडेतोड उत्तर !
पहा हा व्हिडिओ काय म्हणाल्या आमदार डाॅ. मनीषा कायंदे
सिटी बेल लाइव्ह / मुंबई / उमेश भोगले #
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतुन बाहेर पडत नसल्याची टीका केली आहे, या टीकेला शिवसेना आमदार डॉ मनिषा कायंदे यांनी उत्तर देताना सांगितले, “आज संपूर्ण देश हा ऑनलाईन माध्यमाच्या मदतीने म्हणजेच आधुनिक तंत्रनाज्ञांच्या माध्यमातून काम करीत आहे. आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच महाविकास आघाडीतील सर्वच मंत्री व आमदार वेबीनार व इतर दृक्श्राव्य माध्यमातून कामे मार्गी लावीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे (https://mahajobs.maharashtra.gov.in) ऑनलाईन उद्घाटन केले. आमच्या ऑनलाईन जनसंवादाच्या कार्यक्रमाला ३० लाख नागरिकांनी हजेरी लावली होती अशी कबुली स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्याची तयारी नागरिकांची झाली असून महाविकास आघाडीसुद्धा या आधुनिक तंत्रनाज्ञाचा योग्य रीतीने वापर करून जनतेचे प्रश्न सोडवित आहेत. तसेच जिथे मंत्र्याची उपस्थिती गरजेची असेल तिथे महाविकास आघाडीचे मंत्री उपस्थित राहून जनतेची कामे करीत आहेत. कोरोना या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावले उचलत असून खासदार नारायण राणे यांनी अचूक माहिती घेऊन पत्रकार परिषदा घ्याव्यात.”कोरोना महामारीचा सामना संपूर्ण जग करीत असताना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून महाराष्ट्र सरकारने जून महिन्यात मिशन बिगिन अगेन म्हणजेच अनलॉक १ करून महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे सुरू केले आहेत तसेच जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत आहे अशा ठिकाणी काही काळासाठी जुलै महिन्यात लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे जेणेकरून तेथील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. आज देशभरामध्ये धारावी व वरळी पॅटर्नची चर्चा सुरु असून केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र राज्यातील आरोग्य यंत्रणेची पाठ थोपवली आहे.
Be First to Comment