Press "Enter" to skip to content

डॉ.प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी चा निकाल 97.22 टक्के

सिद्धी पाठारे प्रथम 

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

को. ए. सो . डॉ. प्रभाकर रामचंद्र गावंड विद्यालय परळी चा माध्यमिक शालांत परीक्षा -मार्च-2020 परीक्षेचा शेकडा निकाल 97.22% इतका लागला. परीक्षेला एकुण बसलेले विद्यार्थी-36 पैकी 35 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे गावंड विद्यालयाने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली. 

गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी यामध्ये 

प्रथम- पाठारे सिद्धी मनोहर- 88.80%

द्वितीय- तवर आदिनाथ राजू-84.80%

तृतीय-देशमुख निखिल मनोहर-83.00 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. सुधागड तालुका हा आदिवासी  बहुल तालुका असून गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, मजूर व सर्वसामान्य घटकांची मुले या विद्यालयात शिक्षण घेत असतात. येथील मुख्याध्यापक पी.बी. वाघमारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वर्ग प्रचंड मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम संस्कार, व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम करतात.विद्यार्थी देखील अपार कष्ट घेतात. यामुळे दरवर्षी विद्यालयाचा निकाल चांगला लागतो असे मत शाळेचे चेअरमन ऍड. प्रवीण कुंभार यांनी व्यक्त केले.

 गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळा समिती चेअरमन ऍड:प्रवीण कुंभार, शाळेचे मुख्याध्यापक पी.बी. वाघमारे सर व शिक्षकवर्ग आदींनी अभिनंदन केले, व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.