Press "Enter" to skip to content

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील राष्ट्रवादीत दाखल

सुदाम पाटील यांच्या प्रवेशाने पनवेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणाली ने प्रभावित होऊन सुदाम पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

सिटी बेल | मुंबई |

काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पक्षात येण्याने पनवेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करून त्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग त्यात दुहेरी कराचा मुद्दा असेल, पाण्याची समस्या असेल किंवा प्रदूषणाचा मुद्दा असेल आमच्या पूर्ण ताकदीनिशी पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रश्न निकालात काढण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते.

दक्षिण मुंबईच्या बेलार्ड पियर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सदर चा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणाली ने प्रभावित होऊन सुदाम पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षप्रवेश केला. यामध्ये तहीर पटेल जिल्हा उपाध्यक्ष, सेवादल जिल्हाध्यक्ष महिला सेल सुदेशना रायते,अमित लोखंडे जिल्हाध्यक्ष मजदूर सेल,विनीत कांडपिळे जिल्हा अध्यक्ष ट्रान्सपोर्ट सेल, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका शशिकला सिंग,नरेश कुमारी मेहमी,जयश्री खटकले महिला कळंबोली ब्लॉक अध्यक्ष,विर सिंग यांचा समावेश आहे.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना सुदाम पाटील म्हणाले की, पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांच्या झंझावाती कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन मी व माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. काँग्रेस पक्षातील कुणावरही मी नाराज नाही, किंवा कुठल्याही पदाच्या लालसेने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. समाजकारण करत असताना जनता केंद्रित कामे करायची असतात. जनतेची कामे करण्यामध्ये आदिती तटकरे यांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की त्यांच्या सोबत राहिल्याने जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची संधी मला प्राप्त होईल.

सुदाम पाटील यांची प्रतिक्रिया 👇

या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत, खासदार सुनिल तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सूरदास गोवारी,पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, कळंबोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक विजय खानावकर, महिला सेल कार्याध्यक्षा अमिता चौहान, दर्शन ठाकूर यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जयंत पाटील यांची प्रतिक्रिया 👇

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.