नेहा भगतचा प्रथम क्रमांक
सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे)
महाराष्ट्र् राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल नुकताच ऑनलाइन जाहीर झाला.यामध्ये रोहा तालुक्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या प. पु.पांडुरंगशास्त्री आठवले हायस्कूलचा ९८.५२ टक्के निकाल लागला आहे.दरम्यान या निकालामुळे शिक्षक व पालकवर्गाकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
यावर्षी प.पु.पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयातुन ६८ विद्यार्थानी माध्यमिक शालांत परिक्षा दिली होती. यामध्ये ६७ विद्यार्थ्याना उत्तीर्ण होण्यात यश मिळाले.दरम्यान उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नेहा सुरेश भगत या विद्यार्थीनीने ७८.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर श्रेयस गणेश जांबेकर या विद्यार्थ्याने ७७.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.हर्षल रमेश शेळके याने ७७.०० टक्के मिळवून यश संपादन केले आहे.तर याखालोखाल तन्वी जनार्दन गायकर हिने ७६.४० व सिद्धिका हरिभाऊ रटाटे हिने ७५.६० टक्के गुण मिळविले आहेत.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रा.जि.प.आरोग्य शिक्षण समितीचे माजी सभापती भाई पाशिलकर,माजी सरपंच विजय मोरे,विनोद पाशिलकर,सरपंच सुवर्णा रटाटे उपसरपंच यशवंत रटाटे, माजी उपसभापती अनिल भगत,रोहिदास पाशीलकर,सर्व ग्राम पंचायत सदस्य, यांसह मुख्याध्यापक कुंभार सर यांसमवेत शिक्षक,पालक वर्गासह ग्रामस्थानीं अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.






Be First to Comment