डॉक्टरला निलंबीत करे पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्णय
सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |
रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील चांडवे येथे झालेल्या दुचाकी अपघातातील सिध्देश राजेंद्र नरे, वय वर्ष 17 राहणार लोहारमाळ आणि सर्वेश विश्वनाथ कळंबे, वय वर्ष 20 राहणार अमरठ हे दोन तरुण गंभीर जखमी झाले. या जखमींना महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी कोणतेच उपचार न करता जखमी रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठवले. खाजगी रुग्णाल्याने देखील त्याला वेळेत उपचार दिले नाहीत. दरम्यान सुमारे आर्धातासांनी सर्वेश कळंबे याचा मिनिडोअर रिक्षात मृत्यु झाला.
याप्रकरणी नातेवाईक संतप्त झाले असुन त्यांनी मृतदेह ट्रॉम केअर युनिटमध्ये मृतदेह आणला असुन जो पर्यंत दोशी डॉक्टरवर कारवाई केली जात नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय घेतला आहे.








Be First to Comment